Hinjawadi : कंपनीच्या मालाची परस्पर विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – गुजरातमधील कंपनीमध्ये पोहचविण्यासाठी दिलेल्या मालाची परस्पर विक्री करून कंपनीची फसवणूक केली. याप्रकरणी तीन जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आदीनाथ वाघ (रा. पुणे-नाशिक रोड, सोनावणे वस्ती, कुरळी), लहू काशिनाथ कलंगे (वय 27, रा. भांडूप, मुंबई) आणि पवन विठ्ठल रायकर (रा. यशवंत कॉलनी, शिरूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

मुकूंद दिलीप पांचाळ (वय 30, रा. अंबिका निवास, मंगल नगर, थेरगाव) यांनी बुधवारी (दि. 26) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुकूंद पांचाळ यांची बाणेर येथे बिना व्हिस्टा कार्पोरेट नावाची कंपनी आहे. तर आरोपी वाघ हा दलाल, लहू कलंगे हा टेम्पोचालक आणि पवन रायकर हा टेम्पो मालक आहे. फिर्यादी पांचाळ यांनी 6 जानेवारी रोजी मोटारीचे सीट बनविण्यासाठी लागणारे एक लाख 98 हजार 551 रुपयांचे लोखंडी पार्ट सानंद गुजरात येथील एटीयंट या कंपनीला पोचविण्यासाठी दिले होते. मात्र, आरोपींनी आपसांत संगनमत करून टेम्पोतील सर्व माल परस्पर विक्री करून कंपनीची फसवणूक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.