Hinjawadi : घरफोडी करणा-या तीन सराईत चोरट्यांना अटक; बारा गुन्ह्यांची उकल

एमपीसी न्यूज – हिंजवडी परिसरात घरफोडी चोरी करणा-या तीन सराईत चोरट्यांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 2 लाख 25 हजार 200 रुपये किमतीचा चोरीचा माल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे हिंजवडी पोलीस ठाण्यातील 12 गुन्हे उघडकीस आले आहेत.

नारायण जालिंदर कानडे (वय 21, रा. बावधन, ता. मुळशी), रोहित शिंदे, प्रसाद शिंदे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी चोरी करणा-या सराईत गुन्हेगार नारायण याला हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने त्याचे प्रसाद शिंदे, निखिल थोरात, रोहित शिंदे, किरण बोत्रे, इम्रान सय्यद आणि एक महिला यांच्या मदतीने हिंजवडी परिसरात 12 ठिकाणी चोरी केली आहे. त्यानुसार, त्याला अटक करून त्याचे दोन साथीदार रोहित आणि प्रसाद या दोघांना अटक केली आहे.

बावधन परिसरात, बेंगलोर-मुंबई महामार्गावर असलेले टोयोटा शोरूम, ऑडी शोरूम, मारुती सुझुकी शोरूम अशा 12 ठिकाणी चोरी केली आहे. अटक केलेल्या चोरट्यांकडून एक लॅपटॉप, पॉवर बँक, 204 किलो पॉलीकॅब वायर, 26 तांब्याचे नळ, एक टॅब, दोन कॅमेरा, एक तिजोरी, टीव्ही असा एकूण 2 लाख 25 हजार 200 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या कारवाईमुळे हिंजवडी पोलीस ठाण्यातील 12 गुन्ह्यांची उकल झाली आहे. आरोपी चोरट्यांवर यापूर्वी सिंहगड, पौड, हिंजवडी, चंदननगर, भारती विद्यापीठ, लोणीकंद पोलीस ठाण्यांमध्ये सात गुन्ह्यांची नोंद आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, विनायक ढाकणे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड, पोलीस उपनिरीक्षक अनिरुद्ध गिझे, वरुडे, महेश वायबसे, पोलीस कर्मचारी बाळकृष्ण शिंदे, किरण पवार, नितीन पराळे, अतिक शेख, कुणाल शिंदे, विवेक गायकवाड, हनुमंत कुंभार, रितेश कोळी, सुभाष गुरव, अमर राने, झनकसिंग गुमलाडू, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, विकी कदम, अली शेख, आकाश पांढरे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.