Hinjawadi: हिंजवडी, वाकड, चाकणमधून तीन दुचाकी चोरीला

Hinjawadi: Three two-wheelers were stolen from Hinjawadi, Wakad and Chakan रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकीचे लॉक तोडून चोरून नेली. हा प्रकार 18 जून रोजी सकाळी उघडकीस आला.

एमपीसी न्यूज- हिंजवडी, वाकड आणि चाकण परिसरातून अज्ञात चोरट्यांनी तीन दुचाकी चोरून नेल्या आहेत. याप्रकरणी बुधवारी (दि.1) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

शैलेंद्र कैलास गोस्वामी (वय 38, रा. एमएमडी चौक, बावधन) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोस्वामी यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 12 जेजे 0776) 26 जून रोजी सकाळी आठ वाजता बावधन येथे कोठारी शोरूम समोरील सर्विस रोडवर पार्क केली होती.

दिवसभरात अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 26 जून रोजी रात्री साडेआठ वाजता उघडकीस आला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

विलास बाबुराव साळवी (वय 40, रा. गणेश नगर, वाकड रोड, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात त्यांच्या दुचाकी चोरीची तक्रार नोंदवली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी साळवी यांनी त्यांची १० हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 14 सीसी 8436) 17 जून रोजी पहाटे त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली.

रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकीचे लॉक तोडून चोरून नेली. हा प्रकार 18 जून रोजी सकाळी उघडकीस आला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

मोहन आसाराम गाडे (वय 40, रा. नाणेकरवाडी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडे यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 14 ईई 8270) ही दुचाकी 30 जून रोजी खराबवाडी येथील अल्ट्रा इंजिनिअरिंग प्रा. लि. या कंपनीजवळ पार्क केली होती.

अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार रात्री पावणे बारा वाजता उघडकीस आला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like