BNR-HDR-TOP-Mobile

Hinjawadi : हिंजवडीमधील वाहतुकीत बदल; नागरिकांना हरकती व सूचना देण्याचे आवाहन (व्हिडिओ)

815
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – हिंजवडी मधील शिवाजी चौकातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी आणि विनाअडथळा वाहतूक करण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. त्याबाबतचे नोटिफिकेशन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून सोमवारी (दि. 3) काढण्यात आले आहे. शिवाजी चौक ते विप्रो सर्कल फेज एक ते जॉमेट्रीक सर्कल चौक ते शिवाजी चौक अशी चक्राकार एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. ही वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आली असून याबाबत नागरिकांनी रविवार (दि. 9) पर्यंत सूचना व हरकती पोलीस आयुक्तालयाकडे जमा कराव्यात असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

.

दिलेल्या मुदतीत नागरिकांच्या सूचना आणि हरकती आल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालायकडून अंतिम आदेश काढण्यात येणार आहे. तात्पुरत्या चक्राकार वाहतुकीमध्ये पोलीस वाहने, रुग्णवाहिका आणि आग्निशमन दलाचे बंब यांच्याबाबत तात्पुरते निर्बंध लागू नसतील, असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सध्याच्या चक्राकार एकेरी वाहतूक मार्गावर पूर्वीचे काही निर्बंध असतील, तर ते रद्द करण्यात आले आहेत.

पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन म्हणाले, “हिंजवडी मधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर चक्राकार वाहतूक मार्ग सुरू करण्यात आला आहे. बदल करण्यात आलेल्या मार्गावरून प्रवास करताना आलेल्या अनुभवांविषयी प्रवासी नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी इतर दिवशी जे अंतर पूर्ण करण्यासाठी 45 मिनिटांचा वेळ लागत होता, ते अंतर आज केवळ 25 मिनिटांमध्ये पूर्ण झाले असल्याचे त्यांनी सांगितले. तरीही स्थानिक नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवून अंतिम आदेश काढण्यात येतील”

तात्पुरती चक्राकार वाहतूक आणि निर्बंध –

# शिवाजी चौकातून डावीकडे वळून विप्रो सर्कल फेज एक मधून उजवीकडे वळून जॉमेट्रीक सर्कल चौकातून सर्व प्रकारच्या वाहनांना इच्छित स्थळी जात येईल.

# शिवाजी चौकातून उजवीकडे वळण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई करण्यात आली आहे.

# भूमकर चौकातून शिवाजी चौकाकडे येणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना उजवीकडे वळण्यास मनाई करण्यात आली आहे. या सर्व वाहनांनी शिवाजी चौकातून सरळ विप्रो सर्कल फेज एक मधून इच्छित स्थळी जात येईल.

# माणगांव रोडवरून विप्रोसर्कल फेज एक चौकातून शिवाजी चौकाकडे सरळ जाण्यास प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्या सर्व वाहनांनी डावीकडे वळून जॉमॅट्रिक सर्कल येथून इच्छित स्थळी जात येईल.

# मेझा – 9 चौकातून सर्व प्रकारच्या वाहनांना उजवीकडे वळण्यास मनाई करण्यात आली आहे. सर्व प्रकारच्या वाहनांनी डावीकडे वळून शिवाजी चौकातून इच्छित स्थळी जावे.

# फेज – 2 आणि फेज – 3 कडून येणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना जॉमेट्रीक सर्कल चौकातून उजवीकडे वळण्यास मनाई करण्यात आली आहे. सर्व प्रकारच्या वाहनांनी सरळ शिवाजी चौकातून इच्छित स्थळी जावे.

.

HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: