Hinjawadi : बेंगलोर-मुंबई महामार्गावर ट्रक चालकाला लुटले

एमपीसी न्यूज – बेंगलोर-मुंबई महामार्गावर हिंजवडी येथे ट्रक (Hinjawadi) चालकाला मारहाण करून लुटल्याची घटना शुक्रवारी (दि. 31) रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

 

 

प्रथमेश राकेश हाडके (वय 19, रा. गुरुवार पेठ, पुणे), प्रथमेश संपत गिरमे (वय 19, रा. स्वारगेट पोलीस लाईन, पुणे), वैभव मिलिंद निगडे (वय 19, रा. गुरुवार पेठ, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी कादर गुलाब शेख (वय 29, रा. कराड, सातारा) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

 

 

PCMC : सेवानिवृत्ती म्हणजे जगण्याची दुसरी नवीन आवृत्ती – आयुक्त शेखर सिंह

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बेंगलोर-मुंबई महामार्गावरून ट्रक घेऊन जात होते. ते हिंजवडी येथे आले असता त्यांच्या मागून आलेल्या कारमधील तिघांनी फिर्यादी यांचा ट्रक अडवला. तुम्ही आमच्या कारला घासले आहे, असे म्हणत तिघांनी फिर्यादी आणि त्यांचा क्लीनर चेतन जगन्नाथ नवले याला काठीने मारहाण केली. शिवीगाळ, दमदाटी करून फिर्यादीकडील चार हजार 500 रुपये काढून घेतले. फिर्यादीचे एटीएम कार्ड घेऊन त्याद्वारे दहा हजार रुपये काढून घेत एकूण 14 हजार रुपये (Hinjawadi) जबरदस्तीने चोरून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.