Hinjawadi : बारा लाखांच्या फसवणूक प्रकरणी गुजरातमधील व्यापाऱ्यावर गुन्हा

एमपीसी न्यूज – कंपनीसाठी लागणारा माल पुरविण्यासाठी एका व्यापाऱ्याने 12 लाख रुपये घेतले. त्यानंतर कोणताही माल न पुरविता फसवणूक केली. याप्रकरणी गुजरातमधील व्यापाऱ्याच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खुशाल पटेल ऊर्फ खोदाभाई नागजीभाई रमणी (रा. केशवबाग पार्टी, अहमदाबाद, गुजरात) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी चंद्रकांत वसंत मराठे (वय 63, रा. असेंट किर्ती एलीगेट सोसायटी, म्हाळुंगे, पुणे) यांनी मंगळवारी (दि. 17) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 5 सप्टेंबर 2019 ते 17 मार्च 2020 या कालावधीत म्हाळुंगे येथे घडली. फिर्यादी मराठे यांच्या मराठे उद्योग कंपनीसाठी त्यांनी फोटो कॉपी व कागदांची मागणी आरोपी खुशाल पटेल याच्याकडे केली. त्यासाठी मराठे यांनी आरोपीला 12 लाख रुपये आगाऊ रक्‍कमही दिली. मात्र, आरोपीने मालाचा पुरवठा केला नाही. तसेच दिलेले पैसही परत दिले नाही. दिलेल्या पैशाची मागणी केली असता आरोपीने फिर्यादी मराठे यांना शिवीगाळ करीत धमकी दिली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.