Hinjawadi : अवैध पिस्तुल बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक;हिंजवडी पोलिसांची कारवाई

Kondhwa Crime

एमपीसी न्यूज : – अवैधरीत्या पितुल बाळगल्या प्रकरणी (Hinjawadi)हिंजवडी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवाया केल्या. त्यामध्ये दोघांना अटक करत त्यांच्याकडून दोन पिस्तुल आणि सहा जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. याप्रकरणी शनिवारी (दि. 25) गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

पहिली कारवाई माण रोड ते फेज तीन या(Hinjawadi) मार्गावर इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ करण्यात आली. त्यात अजय शंकर राठोड (वय 21, रा. पाषाण, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. अजय याच्याकडून 20 हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे एक पिस्तुल आणि एक हजार रुपये किमतीची दोन काडतुसे जप्त केली आहेत.

Talegaon Dabhade :आंबी येथील युवा कार्यकर्ते तुषार घोजगे यांचे निधन 

दुसरी कारवाई मुंबई-बेंगलोर महामार्गालगत सुस ब्रिजखाली करण्यात आली. यामध्ये जिशान जहीर खान (वय 23, रा. दापोडी, पुणे. मूळ रा. उत्तर प्रदेश) याला अटक करण्यात आली आहे. त्याने स्वताकडे 35 हजार रुपये किमतीचे एक लोखंडी पिस्टल आणि दोन हजार रुपये किमतीची चार जिवंत काडतुसे बाळगली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला सापळा लाऊन अटक केली. दोन्ही गुन्ह्यांचा तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

 

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share