Hinjawadi : घातक हत्यारासह दोघांना अटक

एमपीसी न्यूज – हिंजवडी पोलिसांनी घातक हत्यारासह दोघांना अटक केली. त्यांच्याकडून लोखंडी तलवार, कोयता जप्त केला आहे.

राहुल विठ्ठल शहाणे (वय 22), धर्मराज शिवलिंग येळेकर (वय 22, दोघे रा. अक्कलकोट, सोलापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

  • वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंतर गवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलीस गस्त घालत असताना सुसखिंडीजवळ सुसगावाकडे जाणा-या रस्त्यावर नंबर नसलेली मोपेड दुचाकी आढळली. पोलिसांनी दुचाकीचा पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता दोघांकडे एक तलवार आणि एक कोयता अशी घातक शस्त्रे मिळून आली. ते दोघेजण सुसगावकडे चोरी करण्यासाठी जात असल्याचे निष्पन्न झाल्याने दोघांना अटक केली. त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली अनिरुद्ध गिझे, एम. डी. बरुडे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.