Hinjawadi : ओला कॅब चालकाला लुटणाऱ्या दोन ग्राहकांना अटक

एमपीसी न्यूज – ग्राहकांनी ओला कॅब बूक (Hinjawadi) केली व त्यांनी कॅब चालकालाच मारहाण करत लुटले. हि घटना हिंजवडी येथे सोमवारी (दि.8) पहाटे पाचच्या सुमारास घडली.

चंद्रशेखर विठल हनवते (वय. 42 रा. मोहनगर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी मयूर राजेंद्र ननवरे (वय.22 रा. मुळशी), प्रदिप राजेंद्र सावंत (वय 24 रा. खराडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

Talegaon Accident : महिलेचा अपघातात मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओला कॅब चालक (Hinjawadi) आहेत. त्यांना सोमवारी पहाटे हिंजवडी शिवाजी चौकचा ड्रॉप आला. त्यानुसार त्यांनी आरोपींची राईड घेतली. यावेळी आरोपींनी फिर्यादी यांना गाडी बाजूला घेण्यास सांगितले. गाडी बाजूला घेताच त्यांनी फिर्यादी याचा मोबाईल 15 हजार रुपयांचा फोन व हजार रुपयांचे ल्बूटूथ हिसकावून घेतले व पळून जाऊ लागले. फिर्यादी यांनी हिंजवडी पोलीसात तक्रार केली असता पोलिसांनी त्यांना अटक केली. याचा पुढिल तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.