Hinjawadi : तक्रार केल्याच्या रागातून फोटो स्टुडिओची तोडफोड करून दोघांना मारहाण

एमपीसी न्यूज – विरोधात तक्रार केल्याने पाच जणांनी मिळून फोटो स्टुडिओची तोडफोड केली. फोटो स्टुडिओचे मालक आणि त्यांच्या पत्नीला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना माण येथे घडली.

भास्कर रत्नाकर ढोकणे (वय 45, रा. बनसोडे चौक) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पवन पांडुरंग कापसे (वय ३६, रा. चिंचवड) आणि त्याचे चार साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भास्कर यांचा माण येथे फोटो स्टुडिओ आहे. 10 जानेवारी रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास आरोपी फिर्यादी यांच्या स्टुडिओमध्ये आले. आरोपी पवन याने भास्कर यांना हाताने आणि स्टुडिओमधील अंब्रेलाच्या वायरने मारहाण केली. ही भांडणे सोडविण्यासाठी त्यांच्या पत्नी आल्या असता त्यांनाही मारहाण केली.

शिवीगाळ करत परत आमच्या विरोधात तक्रार केल्यास येरवड्यात येऊन मारीन, अशी धमकी दिली. तसेच आरोपींनी फिर्यादी यांच्या फोटो स्टुडिओची तोडफोड केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.