Hinjawadi: भोजनालयासमोर उभा केलेली दुचाकी चोरीला

Hinjawadi: Two-wheeler parked in front of restaurant stolen हिंजवडी येथील माऊली भोजनालयासमोर मंगळवारी सायंकाळी सहा वाजता पार्क केली होती.

एमपीसी न्यूज- भोजनालयासमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि.17) दुपारी हिंजवडी येथील माऊली भोजनालयासमोर उघडकीस आली.

शरद पोपट पवार (वय 29, रा. मारूती मंदिराजवळ, हिंजवडी गावठाण) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची 15 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एमएच 14 जीक्‍यू 4919) हिंजवडी येथील माऊली भोजनालयासमोर मंगळवारी सायंकाळी सहा वाजता पार्क केली होती.

बुधवारी दुपारी दुचाकी चोरीला गेल्याचे उघडकीस आले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.