Hinjawadi : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

Two-wheeler seriously injured in unidentified vehicle collision

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात जाणा-या अज्ञात वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. 31) सकाळी साडेदहाच्या सुमारास मुंबई- बेंगळुरू  महामार्गावर वाकड येथे घडली.

करीम इब्राहीम शहापूर (वय 40, रा. वारजे, पुणे) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी सोमवारी (दि. 1) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी करीम रविवारी सकाळी महामार्गावरून दुचाकीवरुन वारजेच्या दिशेने जात होते. दरम्यान, वाकड येथे पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

या अपघातात करीम यांच्या डोके, पाय आणि हाताला गंभीर दुखापत झाली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून वाहनाचा शोध सुरु आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.