Hinjawadi : दुचाकी चोरणा-या दोघांना अटक; 15 दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज – दुचाकी चोरणा-या दोन चोरट्यांना अटक करत त्यांच्याकडून 5 लाख 15 हजार रुपये किमतीच्या 15 दुचाकी जप्त केल्या. ही कारवाई हिंजवडी पोलिसांनी केली. या कारवाईमुळे चार पोलीस ठाण्यातील 9 गुन्हे उघडकीस आले आहेत.
आमीन महेबूब शेख (वय 22, रा. पिंपळे निलख), रियाझ सिकंदर शेख (वय 22, रा. भुकूम, ता. मुळशी) अशी अटक केलेल्या दुचाकी चोरांची नावे आहेत.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने दोघांना हिंजवडी येथे  संशयावरून पकडले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी हिंजवडी, भोसरी, चतुःशृंगी आणि चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याचे समजले. दोघांकडून हिंजवडी पोलिसांनी 5 लाख 15 हजार रुपये किमतीच्या 15 दुचाकी जप्त केल्या.
या कारवाईमुळे हिंजवडी पोलीस ठाण्यातील पाच, चतुःशृंगी पोलीस ठाण्यातील दोन आणि भोसरी व चिंचवड पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण 9 चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.