Hinjawadi : दारू पिऊन मारहाण करणाऱ्या पतीचा डोक्यात दगड घालून खून

एमपीसी न्यूज – पती दारू पिऊन मारहाण करीत असे. या रागातून पत्नीने पतीच्या डोक्यात दगड घालून खून केला. ही घटना सोमवारी (दि. 18) सायंकाळी सहाच्या सुमारास पांढरे वस्ती पुनावळे येथे घडली.

रणविजय कुमार साह (वय 29, रा. दिघी रोड, भोसरी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. रानौ गजानन निषाद (वय 24, रा. पांढरे वस्ती, पुनावळे. मूळ रा. छत्तीसगड) असे आरोपी पत्नीचे नाव आहे. तर गजानन जमुनाप्रसाद निषाद (वय 28) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती आणि आरोपी महिला हे पती-पत्नी आहेत. ते मूळचे छत्तीसगड येथील असून रोजीरोटीच्या शोधात ते पुण्यात आले होते. पांढरे वस्ती, पुनावळे येथील कैलास हिंदुजा यांच्या जागेत असलेल्या लेबर कॅम्पमध्ये ते राहत होते. पती वारंवार दारू पिऊन आरोपी पत्नीला मारहाण करीत असे. याचा राग मनात धरून पत्नीने पतीच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.