मंगळवार, डिसेंबर 6, 2022

Hinjawadi : वेश्या व्यवसाय प्रकरणी दलाल महिलेला अटक, तीन पीडितांची सुटका

एमपीसी न्यूज – महिलांकडून वेश्या व्यवसाय (Hinjawadi) करून घेणाऱ्या एका दलाल महिलेला हिंजवडी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि.23) रात्री शिंदेवस्ती, मारुंजी येथे करण्यात आली.

याप्रकरणी सहायक फौजदार महेश वायबसे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दलाल महिलेला अटक करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी तीन महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली आहे.

Maval : जिल्हा नियोजन मंडळातून तालुक्यातील विकासकामांना 47 कोटींचा निधी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदेवस्ती मारुंजी येथील श्रीकांत जाधव (Hinjawadi) यांच्या बिल्डिंगमध्ये एका सदनिकेत वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सदनिकेत बुधवारी रात्री साडेआठ वाजता छापा मारला. त्यावेळी एक दलाल महिला अन्य तीन महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तीन महिलांची सुटका करत दलाल महिलेला अटक केली. कारवाईत 12 हजार 520 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Latest news
Related news