Hinjawadi : नोकरी लावण्याच्या बहाण्याने महिलेवर पतीच्या मित्राकडून बलात्कार

एमपीसी न्यूज – नोकरी लावण्याचे आमिष दाखवून महिलेवर तिच्या पतीच्या मित्राने आणि मित्राच्या मित्राने मिळून बलात्कार केला. महिलेने घडलेल्या प्रकाराबाबत कोणास काही सांगितल्यास तिच्यासह कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

विवेक भोगील (रा. पावडेवस्ती, हडपसर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याबरोबर विष्णू आणि अतुल (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी 25 वर्षीय पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिती महिलेला नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आरोपींनी अतुलच्या रिक्षात बसवून बावधन येथे नेले. तसेच गोव्यातील माफसा येथे एका हॉटेलवर नेऊन विवेक आणि विष्णू या दोघांनी बलात्कार केला. त्यानंतर कात्रज येथील मित्राच्या घरी नेऊन विवेक याने पुन्हा महिलेवर बलात्कार केला. दुस-या दिवशी पीडित महिलेला कात्रज येथे रस्त्यावर सोडले.

तसेच घडल्या प्रकाराबाबत कोणास काही सांगितल्यास तिच्यासह तिच्या घरच्यांना ठार मारणार असल्याची धमकी देत आरोपी पळून गेले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.