Hinjawadi : बाराव्या मजल्यावरून पडल्याने कामगार गंभीर जखमी; ठेकेदारावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – गवंडी काम करत असताना कामगार बाराव्या मजल्यावरून पडला. यामधेय तो गंभीर जखमी झाला. कामगारांना सुरक्षा साधने न पुरवता निष्काळजीपणा केल्याबाबत ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृष्णा विक्रम जाधव असे पडलेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस कर्मचारी राजू सपकाळ यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ठेकेदार व्यंकट सोमला पवार (वय 54, रा. बावधन खुर्द) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहिया जैन कन्स्ट्रक्शन कंपनीची बावधन खुर्द येथे ओडेला ही बांधकाम साईट सुरु आहे. आरोपी पवार हा ठेकेदार आहे. जखमी कृष्णा त्या साईटवर गवंडी म्हणून काम करत होता. ठेकेदाराने कामगारांना सुरक्षा साधने न पुरवता निष्काळीजीपणा केला. त्यामुळे काम करत असताना कृष्णा यांचा तोल जाऊन अपघात झाला. त्यात सुरक्षा साधने नसल्याने त्यांना गंभीर इजा झाली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.