Hinjawadi : ‘तुम्ही खाकीवाले माझं काहीच बिघडवू नाही शकत’; दुचाकीस्वाराचा पोलीस उपनिरीक्षकाला दम

एमपीसी न्यूज – विरुद्ध दिशेने (रॉंग साईडने) दुचाकी चालविल्याबद्दल पोलीस चौकीत आलेल्या दुचाकीस्वाराने चौकीत गोंधळ घातला. पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगावर धावून जात ‘तुम्ही खाकीवाले माझे काही बिघडवू शकत नाही’ असा पोलिसांनाच दम भरला. हा प्रकार हिंजवडी एमआयडीसी पोलीस चौकीत सोमवारी (दि. 28) दुपारी अडीच वाजता घडला.

पोलीस उपनिरीक्षक नंदराज गभाले यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला. त्यानुसार केतन माधव गावंडे (वय 30, रा. मनपाडा, ठाणे) याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी केतन हा सोमवारी दुपारी विरुद्ध दिशेने दुचाकी चालवत होता. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करत त्याला हिंजवडी एमआयडीसी पोलीस चौकीत आणले. त्यावेळी त्याने पोलीस चौकीत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्याने थेट पोलीस उपनिरीक्ष नंदराज गभाले यांच्या अंगावर धावत जात ‘तुम्ही खाकीवाले माझे काही नाही बिघडवू शकत’ असा दम दिला. यावरून त्याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.