Hinjawadi : पाच जणांकडून तरुणाला मारहाण; दोघांना अटक

Young man beaten by five men; Two arrested : भांडणे सोडविण्यासाठी जखमी तरुणाची पत्नी आली असता आरोपींनी तिला देखील मारहाण करत शिवीगाळ केली.

एमपीसी न्यूज – पाच जणांनी मिळून एकाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. यात तरुण गंभीर जखमी झाला. भांडणे सोडविण्यासाठी जखमी तरुणाची पत्नी आली असता आरोपींनी तिला देखील मारहाण करत शिवीगाळ केली.

ही घटना मंगळवारी (दि. 28) रात्री नऊ वाजता बीटवाईज कंपनीच्या बाजूला अफजल खान यांच्या जागेत बाणेर येथे घडली. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

माधव विठ्ठलराव गीते (वय 28, रा. सुसगाव, ता. मुळशी), भरतसिंग तारासिंग सिद्धू (वय 27, रा. बाणेर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह त्यांच्या अन्य तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहम्मद मेहताब छोटे खान (वय 22, रा. बाणेर, ता. मुळशी. मूळ रा. उत्तरप्रदेश) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री फिर्यादी यांनी त्यांचे पंक्चरचे दुकान बंद केले आणि घरी आले. घरी पत्नी , भाऊ आणि मुलांसोबत गप्पा मारत असताना दोन दुचाकींवरून पाच आरोपी आले.

आरोपी माधव याने खान यांना शिवीगाळ करत ‘तू इथे का राहतोस, ही जागा काय तुझ्या बापाची आहे का’ असे म्हणत लोखंडी रॉडने कपाळावर मारले.

खान यांना गेटच्या बाहेर नेऊन अन्य चार आरोपींनी बेदम मारहाण केली. त्यातील एका आरोपीने ‘तुम्ही इथून निघून जावा नाहीतर तुम्हाला मारून टाकीन’ अशी धमकी दिली.

खान यांची पत्नी भांडणे सोडविण्यासाठी आली असता आरोपींनी तिला देखील शिवीगाळ करत मारहाण केली. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.