BNR-HDR-TOP-Mobile

Hinjawadi : क्रेनने चिरडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- मोटारीला धडकून रस्त्यावर पडलेल्या दुचाकीस्वाराला क्रेनने चिरडल्याने त्याचा मृत्यू झाला. सोमवारी (दि. 15) सायंकाळी साडेसातच्या सुमारास बावधन येथे मुंबई-बंगळुरू महामार्गावर हा अपघात झाला.

भरत सुभाष कुमठेकर (वय 28, रा. रायकर मळा, धायरी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी गणेश सुभाष कुमठेकर (वय 28) यांनी फिर्याद दिली असून क्रेनचालकावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भरत हा सोमवारी सायंकाळी कामानिमित्त बाणेर येथे गेला होता. सायंकाळी दुचाकीवरून घराच्या दिशेने जात असताना बावधन येथे असला असता त्याची समोरील एका मोटारीला धडक लागली. यामुळे तो रस्त्यावर पडला. दरम्यान पाठीमागून येणाऱ्या एका क्रेनने (एमएच 12 ईबी 1621) त्याला चिरडले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर क्रेनचालक पसार झाला असून उपनिरीक्षक व्ही.एस.वल्टे अधिक तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A4

.