Hinjewadi : गोदरेज कंपनी साईटवरील एक टन तांब्याची तार चोरीला

एमपीसी न्यूज – हिंजवडीतील गोदरेज कंपनीच्या साईटवरील 16 मिली मिटर जाडीची एक टन तांब्याची तार चोरीला गेली आहे. ही चोरी 22 ते 23 जुलै दरम्यान घडली आहे. 

याप्रकरणी विजय दिनकर करंजकर (वय 50, रा. वाकड पोलिस स्टेशन रोड, वाकड) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, हिंजवडी येथील गोदरेज कंपनीच्या साईटवरील 16 मिली मिटर जाडीची एक टन तांब्याची तार अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. या तांब्याच्या तारेची किंमत25 लाख असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.