Hinjewadi Crime: मैत्रिणीच्या फोनवरून तिच्याच घरच्यांना धमकी देणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : विश्वास संपादन करुन मैत्रिणीचा फोन घेतला व त्याच फोनचा वापर करत मैत्रिणीच्या घरच्यांना व सहकाऱ्यांना धमकी देणाऱ्या तरुणाविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Hinjewadi Crime) हा प्रकार मंगळवारी (दि.9) सकाळी साडे नऊ वाजता घडला.

याप्रकरणी 20 वर्षीय तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अनिकेत कन्हैयालाल मिना (वय.24 रा. मध्यप्रदेश) याच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Senior citizen cheated: गुंतवणूकीवर पाच एकर जमीन देतो म्हणत ज्येष्ठ नागरिकाची पावणे 16 लाखांची फसवणुक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा आरोपी हा मित्र असून त्यांने मंगळवारी फिर्यादी यांच्याकडे जात आरोपीने फिर्यादिचा 16 हजार रुपयांचा मोबाईल घेतला व त्याच फोन वरून फिर्यादी यांच्या कुटुंबाला व कंपनीतील सहकार्याला फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली.(Hinjewadi Crime) यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.