Hinjewadi Crime News : मालाच्या डिलीव्हरीसाठी धमकी देत पैसे उकळणाऱ्या माथाडी कामगारावर गुन्हा

एमपीसी न्यूज – कंपनीत मालाची डिलिव्हरी करायला जाणाऱ्या वाहन चालकाला 8 हजार रुपयांची मागणी करत धमकी देणाऱ्या माथाडी कामगारावर हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला (Hinjewadi Crime News) आहे. ही घटना 3 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी हिंजवडी फेज-3 येथील इन्फोसीस कंपनी येथे घडली आहे.

याप्रकरणी गुरुवारी (दि.26) पोलीस हवालदार राजाराम सराटे यांनी फिर्याद दिली असून धनंजय हनुमंत पाधेर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  कंपनीत किचन मटेरियल डिलीव्हरीसाठी प्रविण सेवक हे गेले होते. यावेळी आरोपीने गाडी अडवून  मी माथाडी काम पाहतो, माल उतरवायचा असाल तर 8 हजार रुपये दे, नाही तर मालासकट गाडी घेऊन जायची, नाहीतर हात पाय मोडेन अशी धमकी दिली. तसेच जबरदस्तीने सेवक यांच्या गुगल पे वरून 8 हजार रुपये काढून घेतले. हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास (Hinjewadi Crime News) करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.