Hinjewadi crime News : मोबाईल शॉपी फोडणाऱ्या आरोपींना अटक; 5.11 लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी तपासादरम्यान परिसरातील 100 पेक्षा जास्त सीसीटिव्ही कॅमेर-यांचे फुटेज तपासले.

एमपीसी न्यूज – हिंजवडी येथे मोबाईल शॉपी फोडून विविध कंपनीचे मोबाईल फोन चोरुन नेणाऱ्या दोघा मुख्य चोरट्यांना गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने जेरबंद केले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 5 लाख 11 हजार 600 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही घटना 26 ऑगस्ट रोजी घडली होती.

रमजान अली उर्फ गुड्डू जलेबी इशा मोहमद अन्सारी ( वय.27, रा. अजमेरानगर, भिवंडी, जि.ठाणे), पाकी मन्सुर शेख ( वय.35, रा. विप्रो सर्कल जवळ फेज 2, हिंजवडी ) असे अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी येथे मोबाईल शॉपी चोरी प्रकरणातील गुन्हेगारांचा शोध सुरू होता. पोलिसांनी तपासादरम्यान परिसरातील 100 पेक्षा जास्त सीसीटिव्ही कॅमेर-यांचे फुटेज तपासले.

यामध्ये या चोरीत 5 ते 6 आरोपी असल्याचे व गुन्हा करते वेळी पांढ्या रंगाच्या इको गाडीचा वापर केल्याचे आढळून आले. परंतु, रात्रीची वेळ असल्याने कोणत्याही ठिकाणी आरोपीची अथवा गाडीची ओळख पटेल असे फुटेज सापडले नाही.

सखोल तांत्रिक तपास केला असता हा गुन्हा भिवंडी, ठाणे येथिल सराईत गुन्हेगार गुड्डू जलेबी याने त्याच्या साथीदारासह केला असल्याचे निष्पन्न झाले.

आरोपीचा शोध घेण्यासाठी एक पथक भिवंडी येथे जाण्याच्या तयारीत असताना  हा आरोपी त्याच्या साधीदारासह वारजे परिसरात असून तो भिवंडीला जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुणे – मुंबई महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचला.

पुनावळे परिसरात हॉटेल तंदुरी नाईट समोर दोन्ही आरोपींनी अटक केली. त्यांच्याकडे असलेलया एमएच 04 जीयु 8710 या चारचाकी गाडीच्या डिक्कीत गुन्हयात चोरीस गेलेले विविध कंपन्यांचे 23 मोबाईल फोन आढळले. त्यानुसार पोलिसांनी त्यांना अटक केली.

त्यांच्याकडून 4 लाख किंमतीची इको गाडी व 1 लाख 11 हजार 600 रुपये किंमतीचे मोबाईल फोन जप्त केले. त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरु आहे.

यातील अटक आरोपी रमजान अली उर्फ गुड जलेबी इशा मोहमद अन्सारी हा कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्या विरुद्ध घरफोडीचे 3 व जबरी चोरीचे 2 गुन्हे दाखल आहेत.अटक आरोपींना पुढील तपासासाठी हिंजवडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख, पोलीस हवालदार प्रवीण दळे,नारायण जाधव, संजय गवारे, धर्मराज आवटे, दादाभाऊ पवार, आदिनाथ मिसाळ, संतोष असवले, तुषार शेटे, लक्ष्मण आधारी, मो. गौस नदाफ, वासुदेव मुंढे, शावरसिद्ध पांढरे, प्रशांत सैद, सुनील गट्टे, तुषार काळे, सुरेश जायभाये, आजिनाथ ओंबासे, धनाजी शिंदे, सुखदेव गावंडे, गोविंद चव्हाण, नागेश माळी,राजेंद्र शेटे आदींनी ही कारवाई केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.