Hinjawadi : डिलीव्हरी बॉयच्या दुचाकीच्या धडकेत एकजण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – डिलीव्हरी बॉयच्या भरधाव दुचाकीच्या धडकेने एकजण गंभीर जखमी झाला. तसेच त्याच्या दुचाकीचेही नुकसान झाले. हिंजवडी आयटीपार्क फेज 1 येथे बुधवारी (दि. 18) साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला.

सचिन राजू ऊर्फ राजाराम साळुंखे (वय 27, रा. माणगाव, साळुंखेवस्ती, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विकास राजू डामसे (वय 29, रा. माणगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू ऊर्फ राजाराम काळुराम साळुंखे असे अपघातात जखमी झालेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विकास डामसे याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून दुचाकी भरधाव वेगात चालवून फिर्यादी यांचे वडील राजू ऊर्फ राजाराम साळुंखे यांना धडक दिली. यात दुचाकीचे नुकसान होऊन साळुंखे गंभीर जखमी झाले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.