Hinjawadi : ‘बेवकूफ’ ऑनलाईन शॉपिंग साईटने तरुणाला बनवले ‘बेवकूफ’

एमपीसी न्यूज – बेवकूफ (bawakoof.com) या ऑनलाईन शॉपिंग साईटवरून पाच टी शर्ट मागवले. त्यातले चारच आले. त्यासाठी कस्टमर केअरशी संपर्क केला. कस्टमर केअरच्या प्रतिनिधीने तरुणाला 39 हजार 832 रुपयांचा ऑनलाईन गंडा घातला. हा प्रकार 1 ते 11 मे 2019 या कालावधीत घडला.

निकोल निलेश शर्मा (वय 22, रा. बावधन, पुणे. मूळ रा. अकब, जि. रतलाम, मध्यप्रदेश) या तरुणाने याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

_MPC_DIR_MPU_II
  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, bawakoof.com या ऑनलाईन शॉपिंग साईटवरून निकोल याने पाच टीशर्ट मागवले. त्यातील चार टीशर्ट निकोल याला मिळाले. एक टीशर्ट मिळाला नसल्याने त्याने शॉपिंग साईटच्या कस्टमर केअरशी संपर्क केला. कस्टमर केअरच्या प्रतिनिधीने त्यांना एक लिंक पाठवली. ती लिंक पुन्हा आलेल्या नंबरला रिसेन्ड करण्यास सांगितले. त्यानुसार निकोलने लिंक रिसेन्ड केली.

निकोलच्या मोबाईलवर आलेला ओटीपी घेऊन त्याआधारे निकोलच्या बँक खात्यातून 39 हजार 832 रुपये काढून घेतले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.