Hinjwadi: कंपनीत गुंतवणूक करण्यास भाग पाडून 33 जणांची पावणेपाच कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज – कंपनीत गुंतवणूक करण्यास भाग पाडून विविध आमिष दाखवून 33 जणांची तब्बल 4 कोटी 78 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार हिंजवडी येथे समोर आला आहे. याप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

विवेक सुर्यकांत खोकराळे (रा. हिवरेतर्फे नारायणगाव, जुन्नर), सचिन जठार (रा. मुळेवाडी, आंबेगाव), नितीन हासे (रा. चिखली, संगमनेर), रूपसिंग बिष्णोई , अंकिता तारापुरवाला (दोघेही रा. लोढा कॉम्प्लेक्स, रावेत), सचिन सिसोदिया, शौलंद्र उपाध्यय, रिमा सिसोदिया, निलम उपाध्यय (सर्व रा. इंदोर, मध्यप्रदेश) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी राजश्री निलेश वाणी (वय 43, रा. नारायणगाव) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी वाणी यांच्यासह 33 जणांना विविध आमिषे दाखवून कंपनीत गुंतवणूक करण्यास भाग पाडले. बोगस कागदपत्रे दाखवून त्यांच्याकडून 5 ते 15 लाख असे 33 जणांकडून तब्बल 4 कोटी 78 लाख घेतले. पैशाची मागणी केल्यास धमकी दिली. तसेच बनावट धनादेश देऊन आर्थिक फसवणूक केली.

हिंजवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक देंडगे तपास करत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.