Hinjwadi: प्रियकराने तरूणीचे सोशल मिडियावर टाकले अश्लील फोटो, गळा दाबून खुनाचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी बलात्कार करून अश्लील फोटो व व्हिडीओ काढले. तरुणीच्या मोबाईलमधील इतर मुलांचे फोटो पाहून चिडलेल्या प्रियकराने तरुणीला लाथाबुक्यांनी मारहाण करून तिचा गळा दाबून बेशुध्द करत तिच्या मोबाईलवरून अश्लील फोटो, व्हिडीओ सोशल मिडीयावर टाकून बदनामी केली. हा प्रकार हिंजवडी येथे उघडकीस आला आहे.

याप्रकरणी 19 वर्षीय तरूणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गजानन शामराव सूर्यवंशी (वय 23, रा. भोकर, नांदेड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी यांच्यात प्रेमसंबंध होते. आरोपीने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी बलात्कार केला. अश्लील फोटो, व्हिडीओ काढले. तरुणीच्या मोबाईलमध्ये इतर मुलांचे फोटो पाहून चिडलेल्या आरोपीने फिर्यादीला तू इतर मुलांशी का बोलतेस ? असे विचारून पोटात, डोक्यात, हाताने लाथाबुक्यांनी मारहाण केली.

गळा दाबून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तिला बेशुद्धावस्थेत रूमवर एकटेच सोडून तिची दुचाकी घेऊन पसार झालेल्या आरोपीने तरुणीच्या मोबाईलवरून सोशल मिडीयावर अश्लील फोटो, व्हिडीओ टाकले. तुला काय करायचे ते कर अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.