Hinjwadi: ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव ट्रकची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. सुसगाव येथे गुरुवारी (दि. 30) रात्री सव्वानऊच्या सुमारास हा अपघात झाला.

अतिक अहमद मोहंमद रफिक शेख (वय 23, रा. सूसरोड, सूसगाव) असे या अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर अशोक कडुबा रोकडे (वय 27, रा. तरवाडा, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) असे अटक केलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. याप्रकरणी मृत अतिक शेख याचा मावस भाऊ सुरज गफूर शेख (वय 27, रा. कात्रज) याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिक शेख हा दुचाकीवरून जात असताना आरोपी रोकडे याने त्याच्याकडील ट्रक भरधाव चालवून दुचाकीला धडक दिली. यात अतिक याचा मृत्यू झाला. अपघातानंतर आरोपी रोकडे घटनास्थळी न थांबता ट्रक तेथेच सोडून निघून गेला होता. पोलिसांनी त्याला शुक्रवारी (दि. 31) अटक केली. हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव आंगज तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.