Hinjwadi : औषधात लघुशंका केल्याचा ठपका ठेवला म्हणून प्रयोगशाळेतील तंत्रज्ञाची आत्महत्या

एमपीसी न्यूज – औषधात लघुशंका केल्याचा कंपनीने ठपका ठेवल्याने नोकरीचा राजीनामा दिलेल्या प्रयोगशाळेतील तंत्रज्ञाने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार 26 जुलै रोजी घडला.

सुंदराज शाहूराज गोरटे (वय 32, रा. गणेश कॉलनी, वाकड) असे आत्महत्या केलेल्या तंत्रज्ञाचे नाव आहे.

सुंदराज हा हिंजवडीतील औषध निर्माण करणाऱ्या एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. औषधात लघुशंका केल्याचा कंपनीने सुंदराज याच्यावर ठपका ठेवला होता. त्यामुळे चौकशी होईल याची भीती त्याला होती. त्यामुळे त्याने नोकरीचा राजीनामा दिला होता.

सुंदराज याने सोशलमीडियावर नैराशजनक स्टेटस ठेवले होते. या नैराश्यातूनच सुंदराज याने आत्महत्या केली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल केला नसून बाबी पडताळून चौकशी केली जात असल्याचे हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.