Hinjwadi: रिक्षाचालकाकडून तरूणीचा विनयभंग

एमपीसी न्यूज – कामावरून घरी निघालेल्या 21 वर्षीय तरूणीचा रिक्षाचालकाने अश्लील हावभाव करत विनयभंग केला. ही घटना बाणेर येथे हॉटेल बॉटल रॉकजवळ घडली.

याप्रकरणी तरूणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरूणी बाणेर येथील एका मार्केटींग कंपनीत नोकरी करते. 14 जून रोजी रात्री साडेआठ वाजता ती नेहमीप्रमाणे कामावरून घरी पायी निघाली होती. बाणेर येथील हॉटेल बॉटल रॉकजवळ एक रिक्षाचालक तिच्या बाजूने हळू-हळू येत होता.

  • तो जवळ आल्याने तरूणी बाजूला गेली. यावेळी रिक्षाचालकाने पुढे जाऊन रिक्षा थंबविली आणि तरूणीला आवाज देऊन अश्लील हावभाव करत विनयभंग केला. हिंजवडी ठाण्याचे फौजदार आर. आर. दिवटे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.