Hinjwadi: जागेच्या वादातून एकाला जीवे मारण्याची धमकी

Hinjwadi: Threat to kill one over land dispute फिर्यादी कंपनीत जात असताना आरोपीने त्यांना शिवीगाळ करत काठीने कानावर, डोळ्यावर मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी दिली.

एमपीसी न्यूज- कंपनीत जाणार्‍या एकाला जागेच्या जुन्या भांडणातून शिवीगाळ करत काठीने मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार शुक्रवारी (दि.12) सुसगांव येथे घडला.

दत्तात्रय संभाजी वाईकर (वय 36, रा. सुसगांव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दिनकर शंकर वाईकर (वय 50) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांच्यात जागेचा वाद आहे. जागेच्या जुन्या वादातूनच शुक्रवारी सकाळी फिर्यादी कंपनीत जात असताना आरोपीने त्यांना शिवीगाळ करत काठीने कानावर, डोळ्यावर मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी दिली. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.