Hinjwadi : शिवरुद्र मित्र मंडळाच्या वतीने वृक्षारोपण

एमपीसी न्यूज – हिंजवडी येथील शिवरुद्र मित्र मंडळाच्या वतीने 36 कोटी वृक्ष लागवड अभियानास हातभार तसेच सामाजिक जबाबदारी म्हणून ग्रामदैवत श्री म्हातोबा देवस्थानच्या टेकडीवर वृक्षारोपण करण्यात आले.

कडुनिंब, बाभूळ, निलगिरी, अशोका, वड, पिंपळ, चिंच यासह झटपट वाढणाऱ्या व पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण असणाऱ्या अनेक प्रजातींचे यावेळी रोपण करण्यात आले. निसर्गाच्या सानिध्यातील आणि आयटी नगरी हिंजवडीतील पंचतारांकित आयटी कपण्यांच्या आवारात असलेल्या ग्रामदैवत म्हातोबा महाराज टेकडीच्या सौंदर्यात या वृक्षारोपणाने आणखी भर पडणार आहे.

मंडळाचे सभासद विक्रम साखरे, युवा नेते संजय जांभुळकर, विजय साखरे, श्रीकांत साखरे, ओंकारे साखरे, गणेश साखरे यांच्यासह सर्व सभासदांच्या हस्ते हे वृक्षारोपण करण्यात आले तसेच दरवर्षी पावसाळयात वृक्षारोपण करण्याचा संकल्प करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.