Hinjwadi: वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव वेगातील वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. ही घटना 13 मार्च रोजी मुंबई -बंगळुरु महामार्गावरील ओंकार पुलावर घडली.

गजानन विनायक नाईक (वय-28) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ अमोल विनायक नाईक (वय-31, रा. सिंहगड रोड, पुणे) याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

13 मार्च रोजी गजानन रात्री साडेदहाच्या सुमारास मुंबई -बंगळुरु महामार्गावरील ओंकार पुलावरून वाकडकडे जात होते. त्यावेळी भरधाव आलेल्या वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या गजानन यांचा मृत्यू झाला. दुचाकीचेही नुकसान करून आरोपी वाहन चालक घटनास्थळी न थांबता पळून गेला. फौजदार दिवटे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.