Hinjwadi: तरूणीचा भररस्त्यात विनयभंग, आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज – मित्रासह हॉटेलमधून जेवन करून घरी जाणार्‍या तरूणीचा एकाने विनयभंग केली. तसेच तिच्या मित्राला शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. हा प्रकार गुरूवारी रात्री अकरा वाजता वाकड-हिंजवडी रोडवर घडला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

शंकर जयवंत गायकवाड (वय 41, रा. जांबेगाव, ता. हवेली, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 20 वर्षीय तरूणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरूणी शुक्रवारी रात्री अकरा वाजता मित्रासह जेवन करून वाकड-हिंजवडी रोडवरून घरी जात होती. त्यावेळी तिच्याकडील पाण्याची बाटली खाली पडल्याने ती उचण्यासाठी गेली असता तेथे आलेल्या आरोपीने तिचा विनयभंग केला. तसेच तिच्या मित्राला शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली.

हिंजवडी पोलीस ठाण्याचे फौजदार आहिरे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.