Dapodi : दुर्घटनेतील कामगाराच्या कुटुंबातील एकाला महापालिकेत नोकरी द्या, शिवसेनेची मागणी

एमपीसी न्यूज – दापोडीत महापालिकेच्या ‘अमृत’ योजनेंतर्गत ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम सुरू असताना तीस फूट खोल खड्ड्यात अडकल्याने नागेश जमादार या कामगाराचा मृत्यू झाला आहे.  नागेशच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात यावी. कुटुंबातील एकाला महापालिकेत कायम स्वरूपाची नोकरी द्यावी, अशी मागणी शिवसेनेने महापालिकेकडे केली आहे.

याबाबत पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता मकरंद निकम यांना निवेदन दिले आहे. यावेळी शिरुर जिल्हासंघटिका सुलभा उबाळे, उपजिल्हा संघिटका स्वरूपा खापेकर, नगरसेवक राजू बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, युवतीसेना अधिकारी प्रतीक्षा घुले,  विभाग संघटक निलेश हाके, शिल्पा अनपन, संगीता आल्हाट,  विकास गायकवाड, सिद्धार्थ पगारे, लक्समन शिवशरण, प्रताप शीरशेट्टी  उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

दापोडीत महापालिकेच्या ‘अमृत’ योजनेंतर्गत ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम सुरू होते. काम करत असताना तीस फूट खोल खड्ड्यात अडकलेल्या नागेश जमादार या कामगाराचा मृत्यू झाला आहे. महापालिकेच्या आणि ठेकेदाराचा ढिसाळ कारभार आणि दुर्लक्षामुळेच मातीच्या ढिगा-याखाली गुदमरुन नागेशचा मृत्यू झाला आहे.

नागेश हा घरातील एकटाच कमवता होता. त्याच्या मृत्यूमुळे जमादार कुटुंबीयांवर आर्थिक संकट आले आहे. नागेशच्या मागे चार बहिणी, आई, वडील असा मोठा परिवार आहे. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागेशच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी. कुटुंबातील एका सदस्याला महापालिकेत कायम स्वरूपाची नोकरी देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.