Pune News: ब्रिटनहून आलेला एक तरुण कोरोनाबाधित

नव्या स्ट्रेनची लागण बाबत दोन दिवसांत त्याचा अहवाल

एमपीसी न्यूज : ब्रिटनहून आलेल्या एक तरुण कोरोना बाधित आहे; परंतु त्याला ब्रिटनमधील व्हायरसच्या नव्या स्ट्रेनची लागण झाली आहे का, याची तपासणी केली जाणार असून, दोन दिवसांत त्याचा अहवाल येणार आहे. दरम्यान 1 डिसेंबर पासून पुण्यात 542 प्रवासी ब्रिटनहून परतले आहेत. त्यांचा शोध घेउन तपासणी करण्याची मोहीम महापालिकेने सुरू केली आहे.

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याने पुन्हा एकदा ब्रिटनमध्ये लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे. ब्रिटनची राजधानी असलेल्या लंडनसह अन्य काही भागात या नव्या व्हायरसने थैमान घातले आहे. तेथून अन्य देशांमध्ये जाणार्‍या नागरिकांची कसून तपासणी केली जात आहे. काही देशांनी ब्रिटनला जाणार्‍या आणि तेथून येणार्‍या विमानसेवा काही काळासाठी स्थगित केल्या आहेत.

गोखलेनगर भागात राहणारा हा 26 वर्षीय तरुण 15 दिवसांपूर्वी ब्रिटनहून पुण्यात आला. नियमाप्रमाणे त्याचे विलगीकरण करण्यात आले. त्याला मात्र त्याला करोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्याला कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत, परंतु त्याला जी लागण झाली आहे ती ब्रिटनमधील नव्या व्हायरसची आहे का याची तपासणी करणे आवश्यक आहे. ती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या तरुणाने भारतात आल्यानंतर नियमाप्रमाणे करोनाची चाचणी करून घेतली. त्याची चाचणी पॉझिटिव्ह आली. त्याला ताबडतोब विलगीकरण करण्यात आले. त्याला कोरोनाचीच कोणती लक्षणे नाहीत त्यामुळे ब्रिटन व्हायरस असण्याची शक्यता आतातरी दिसून येत नाही. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून त्याची एनआयव्ही  मध्ये टेस्ट केली जाणार आहे.

दरम्यान, 1 डिसेंबरपासून ब्रिटनहून पुण्यात 542 प्रवासी आले आहेत. त्यापैकी 342 प्रवासी पुण्यातील असून त्यांचा ट्रेस लागला आहे. उर्वरीत प्रवासी हे जिल्ह्यातील, काहीजण भिवंडी व अन्य जिल्ह्यातील आहेत. त्यांचे फोन क्रमांक व अन्य माहिती पोलिसांकडे देण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेतील अधिकार्‍यांनी दिली.
 
महापालिकेतील सह आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे

ब्रिटनमधून आलेल्या ज्या तरुणाला कोरोनाची बाधा झाली आहे, त्याच्यामध्ये नव्या व्हायरसचा शिरकाव आहे का याची तपासणी केली जाणार आहे. एनआयव्ही मध्ये त्याची जिनोम सिक्वेन्सिंग ही टेस्ट होणार आहे. त्याचा अहवाल शनिवार-रविवार पर्यंत येईल, त्यानंतर या नव्या व्हायरसची लागण झाली आहे का, हे समजेल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.