Tokyo Paralympics : ऐतिहासिक ! सुवर्ण पदकानंतर अवनी लेखराने कांस्यपदकावर कोरलं आपलं नाव 

एमपीसी न्यूज – पॅरालिंपिक स्पर्धेत दहा मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण पदक जिंकलेला अवनी लेखराने 50 मीटर रायफल थ्री पोझीशन SH1 प्रकारात दुसरे पदक जिंकले. अवनीने या प्रकारात देशासाठी कांस्य पदकाची कमाई केली आहे. 

अवनीने यापूर्वी 249.6 गुणांची कमाई करत सुवर्ण पदक पटकावले होते. तिची ही कामगिरी विश्ववक्रमीही ठरली होती. ऑलिम्पिकमध्ये नेमबाजी प्रकारात सुवर्ण कामगिरी करणारी ती पहिली भारतीय खेळाडूही ठरली. ऑलिम्पिक इतिहासात एकाच स्पर्धेत देशासाठी दोन पदक जिंकणारी अवनी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.

भारताच्या खात्यात आता 12 पदके जमा झाली आहेत. पॅरालिंपिक स्पर्धेत भारताने आतापर्यंत 2 सुवर्ण पदकांची कमाई केली असून 6 रौप्य आणि 4 कांस्य पदकासह एकूण 12 पदके मिळाली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.