BNR-HDR-TOP-Mobile

National : अयोध्या प्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

0

एमपीसी न्यूज – गेल्या अनेक दिवसापासून सर्वांचे लक्ष लागून असलेल्या रामजन्मभूमी व बाबरी मशीद प्रकरणावर अखेर सर्वोच्च न्यायालय उद्या शनिवारी (दि. 9) निकाल देणार आहे. या खटल्याची सुनावणी 16 ऑक्टोबरलाच पूर्ण झाली होती. त्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. या निकालासाठी संपूर्ण देशभरात प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला असून अयोध्येत कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे.  

सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायधीश रंजन गोगोई हे 17 नोव्हेंबरला निवृत्त होत आहे. त्यामुळे 5 ऑगस्टपासून दररोज सुनावणी सुरु होती. ही सुनावणी 16 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण झाली. त्यानंतर सबंध देशाचे लक्ष या प्रकरणाच्या अंतिम निकालाकडे लागले आहे. अखेर उद्या शनिवारी सकाळी साडेदहा वाजता सर्वोच्च न्यायालय आपला अंतिम निर्णय देणार आहे. १३४ वर्षांचा हा जुना खटला असून त्यावर येणारा उद्याचा अंतिम निकाल हा ऐतिहासिक निकाल असणार आहे.

या निकालाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असून सर्वांना शांतता राखून समाजकंटकांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरही पोलिसांची तीव्र नजर असणार आहे.

HB_POST_END_FTR-A2

.