मंगळवार, डिसेंबर 6, 2022

Purushottam Karandak competition : पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचा ऐतिहासिक निकाल, यंदाचा करंडक कोणालाच नाही

एमपीसी न्यूज : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित यंदाच्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचा यंदाचा निकाल ऐतिहासिक लागला आहे. यंदाच्या स्पर्धेत एकही एकांकिका पात्र न आढळल्याने यंदाचा करंडक कोणत्याही संघाला देण्यात आला नाही.(Purushottam Karandak competition) स्पर्धेच्या 57 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारचा निर्णय देण्यात आला आहे. याशिवाय सर्वोत्तम अभिनय, वाचिक अभिनय आणि दिग्दर्शन या विभागांतही पात्र कलाकार न आढळल्याने ही पारितोषिकेही कोणालाच जाहीर करण्यात आली नाहीत.

मात्र, करंडकासाठी पात्र एकांकिका नसली तरी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले असून ते पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी (पीआयसीटी) या महाविद्यालयाच्या ‘कलिगमन’ या एकांकिकेस जाहीर झाले आहे. या संघास पुरुषोत्तम करंडक मिळणार नसला तरी पाच हजार एक रुपयांचे रोख बक्षीस मिळणार आहे.

Teacher’s award : अभिमानास्पद ! साते येथील आदिनाथ आगळमे यांना पुणे जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार

द्वितीय क्रमांकाचा हरी विनायक करंडक तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती या महाविद्यालयाच्या ‘भू भू’ या एकांकिकेस जाहीर झाला आहे.(Purushottam Karandak competition) तर, तृतीय क्रमांकाचा संजीव करंडक मॉडर्न कला, शास्त्र आणि वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, शिवाजीनगर या महाविद्यालयाच्या ‘गाभारा’ या एकांकिकेस जाहीर झाला आहे. यंदा सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेचे बक्षीसही कोणताही पात्र संघ न आढळल्याने जाहीर करण्यात आले नाही.

 

Latest news
Related news