-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune crime news: गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरवणार्‍या सराईताला अटक

History sheeter criminal arrested for spreading terror by holding a rally during the funeral of a criminal.

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज- गुंड माधव वाघाटे याच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरवणार्‍या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. सिद्धार्थ संजय पलंगे (वय 21) असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. 

सराईत गुन्हेगार माधव वाघाटे याचा खून झाल्यानंतर पुण्यातील सहकारनगर परिसरातून त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. या अंत्ययात्रेदरम्यान शंभरहून अधिक दुचाकीवरून रॅली काढण्यात आली होती. रॅली काढण्यामध्ये सिद्धार्थ पलंगे हा आघाडीवर होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून मागील दोन महिन्यांपासून तो फरार होता.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

दरम्यान गुन्हे शाखेचे पोलीस अमलदार अमोल पवार यांना आरोपी सिद्धार्थ पलंगे हा खेड शिवापुर दर्गा जवळ मित्रांना भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी मंगळवारी सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्यावर सहकारनगर दत्तवाडी आणि बंडगार्डन पोलीस ठाण्यांमध्ये ही जबर दुखापत आणि मारामारीचे बरेेेच गुन्हे दाखल आहेत.

मी कारवाई अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, पोलीस उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, संजय गायकवाड पोलीस कर्मचारी अमोल पवार, अजय थोरात, इमरान शेख, तुषार माळवदकर, महेश बामगुडे यांच्या पथकाने केली.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.