Wakad : वाकड पोलिसांकडून सराईत वाहनचोरला अटक; वाहनचोरीचे तीन गुन्हे उघड

एमपीसी न्यूज – वाकड पोलिसांनी एका सराईत वाहन चोराला अटक केली आहे. त्याच्याकडून टाटा सुमो, रिक्षा आणि दुचाकी अशी तीन वाहने जप्त करण्यात आली आहेत.

पंकज हरिप्रसाद बाजुळगे (वय 21, रा. श्रीनगर, रहाटणी) असे अटक केलेल्या सराईत चोरट्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 मार्च रोजी सकाळी एक टाटा सुमो चोरीला गेल्याचा प्रकार रहाटणी मधील फाईव्ह गार्डन सोसायटीच्या गेट समोर उघडकीस आला. याप्रकरणी आनंद तात्या साठे (वय 32, रा. औंध) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या गुन्ह्याचा तपास करत असताना एक टाटा सुमो वाकड परिसरात फिरत असून त्या गाडीला नंबरप्लेट नाही. याचा पोलिसांना संशय आल्याने त्यांनी नंबरप्लेटशिवाय फिरणा-या सुमोला गाठले आणि चालक पंकज याच्याकडे चौकशी केली.

पोलिसांच्या चौकशीमध्ये ताब्यात घेतलेली सुमो ही चोरीची असल्याचे आरोपी पंकज याने सांगितले. पोलिसांनी त्याला अटक केली. घटना घडल्यानंतर चोवीस तासाच्या आत पोलिसांनी आरोपीला पकडले. त्याच्याकडे आणखी चौकशी केली असता त्याने मागील सहा ते सात महिन्यांपूर्वी वाकड परिसरातून एक रिक्षा (एम एच 14 / सी यु 2129) आणि एक दुचाकी (एम एच 14 / एफ ई 2061) चोरी केल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून टाटा सुमोसह एक लाख 30 हजार रुपये किमतीची तीन वाहने जप्त केली.

या कारवाईमुळे वाकड पोलीस ठाण्यातील वाहन चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपी पंकज हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी वाकड पोलीस ठाण्यात तीन चोरीचे, पिंपरी पोलीस ठाण्यात एक अपहरणाचा, आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यात दोन घरफोडीचे असे सहा गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत मोहिते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने, पोलीस उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर, पोलीस कर्मचारी बापूसाहेब धुमाळ, बिभीषण कन्हेरकर, जावेद पठाण, बाबाजान इनामदार, नितीन ढोरजे, विक्रम जगदाळे, प्रमोद कदम, विक्रम कुदळ, नितीन गेंगजे, शाम बाबा, सुरेश भोसले, सचिन नरुटे, सुरज सुतार, तात्या शिंदे, प्रशांत गिलबिले, दीपक भोसले यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.