Pune : येरवडा कारागृहात पुन्हा कैद्यांची मारामारी; एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – येरवडा कारागृहात पुन्हा एकदा कैद्यांमध्ये मारामारी झाली. यामध्ये एका कैद्याला पाच अन्य कैद्यांनी मिळून जबर मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. काराहगृहातील ही तीन दिवसातील सलग तिसरी घटना आहे.

मोहम्मद जमाल नदाफ असे मारहाणीत जखमी झालेल्या कैद्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास तुरुंगातील पाण्याच्या हौदाजवळ पाच कैद्यांनी मिळून नदाफ याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने दगड, सिमेंटचा तुटलेला प्लॅस्टरचा तुकडा, पाण्याने भरलेली प्लास्टिकची बादली याने जबर मारहण केली. घटनेत नदाफ गंभीर जखमी झाला आहे.

दरम्यान, तुरुंग अधिका-यांनी नदाफला सोडवले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.