Maval : जागतिक एड्स दिनानिमित्त एचआयव्ही तपासणी शिबिर

एमपीसी न्युज – जागतिक एड्स दिनानिमित्त मावळ तालुक्यातील स्माईल व्यसनमुक्ती केंद्र,उर्से या संस्थेच्या वतीने एचआयव्ही तपासणी शिबीर आणि जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

शनिवारी (दि. ३) झालेल्या या कार्यक्रमात ५० जणांनी स्वेच्छेने तपासणी करून घेतली. कार्यक्रमास, रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी व आय सी टी सी सेंटर मायमर मेडिकल कॉलेज तळेगाव दाभाडे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे उपस्थित होते. तसेच स्माईल व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक अध्यक्ष हर्षल पंडित, रो. सुरेश शेंडे, सेक्रेटरी रोटरी क्लब रो. संजय मेहता, आय सीटी सी सेंटर मायमर मेडिकल कॉलेजच्या प्रमुख सल्लगार शुभांगी कदम व लॅब प्रमुख जितेंद्र धनगावन हे उपस्थित होते.

Rotary club of Pune : जॅकी श्रॉफ व मिनाक्षी शेषाद्री यांच्या हस्ते ‘हॅपी फॅमिली कीट’चे वाटप

कार्यक्रम यशस्वितेसाठी स्माईल व्यसनमुक्ती केंद्राचे प्रणव देशमुख, नितिन नाटेकर, हर्षल जोशी, प्रकाश धिडे, शितल आठल्पे व सर्व कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभले. 50 जणांनी स्वइच्छेने आपली तपासणी ही करुन घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.