Hinjawadi : हिंजवडीत दोन ठिकाणी होर्डिंग कोसळले

एमपीसी न्यूज – हिंजवडी (Hinjawadi) परिसरात मंगळवारी (दि. 30) आलेल्या वादळी पावसात दोन ठिकाणी होर्डिंग कोसळले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
Alandi : पालखी सोहळा अवघ्या काही दिवसांवर असताना इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली
मंगळवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास पिंपरी-चिंचवड शहरात पाऊस पडला. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. तर काही भागात केवळ वादळ सुटले. हिंजवडी येथे आलेल्या वादळात दोन ठिकाणी होर्डिंग कोसळण्याच्या घटना घडल्या.
हिंजवडी येथील माण रस्ता आणि हिंजवडी (Hinjawadi) फेज दोन रस्त्यावर होर्डिंग कोसळले. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. होर्डिंगचा काही भाग कोसळला आहे. तर काही होर्डिंग वरील जाहिरातीचा फलक उडाला आहे.