Hockey Competition: पंजाबकडून पुणे विद्यापीठ पराभवाचा धक्का

एसएनबीपी २८वी नेहरू अखिल भारतीय आंतरविद्यापीठ हॉकी स्पर्धा: लव्हली विद्यापीठकडून मुंबई विद्यापीठ पराभूत  

एमपीसी न्यूज:  पंजाबी युनिव्हर्सिटी, पटियाला आणि लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, फगवाडा यांनी अनुक्रमे सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठ व मुंबई विद्यापीठ संघाचा एसएनबीपी प्रायोजित २८ व्या नेहरू अखिल भारतीय आंतरविद्यापीठ हॉकी स्पर्धेत पराभव केला. दुसरीकडे एसआरएम युनिव्हर्सिटी, चेन्नई संघाने बनारस विद्यापीठ संघाला ४-३ गोलने नमविले.

असोसिएशन ऑल इंडियन युर्निर्व्हसिटीजच्या सहकार्याने व हॉकी इंडियाच्या मान्यतेने पिंपरी येथिल मेजर ध्यानचंद हॉकी पॉलीग्रास स्टेडियमच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत पंजाबी विद्यापीठ संघाने पश्चिम विभागातील विजेत्या सावित्रीबाई फुले विद्यापीठ संघाचा १-० गोलने पराभव केला. विजयी पंजाब संघाचा एकमेव गोल २४ व्या मिनिटाला पंजाबच्या अनिलने संघाला २४ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी स्ट्रोकवर केला. पंजाब संघासाठी हा गोल विजयी गोल ठरला.

आजच्या पहिल्या झालेल्या लढतीत एसआरएम विद्यापीठ, चेन्नई संघाने बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी संघाला ४-३ गोलने नमविले.  बनारस विद्यापीठ संघाच्या हर्षदीप कपूर तिसºया मिनिटाला गोल करून आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर त्यांच्या आलम फिरोजने १४ व्या मिनिटाला दुसरा गोल करून आघाडी वाढविली. एसआरएम विद्यापीठ संघाच्या रोशन एफने १६ व्या व जीवाकुमार एचबीने २५ व्या मिनिटाला प्रत्येकी एक गोल करून बरोबरी साधली. मध्यंतरानंतर एसआरएम विद्यापीठ संघाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट व नियोजनपूर्वक खेळ करण्यास सुरूवात केली. विघ्नेश एन. ने ५२ व्या मिनिटाला गोल केला. नंतर ५८ व्या निमिटाला बनारस संघाच्या राजा यादवने आपल्या संघाचा तिसरा गोल करून बरोबरी साधली. पण या बरोबरीचा आनंद त्यांना जास्त वेळ घेता आला नाही. एसआरएम विद्यापीठ संघाच्या हरिहरन एन ने ५९ व्या मिनिटाला संघाचा चौथा गोल केला. या गोलची बरोबरी बनारस विद्यापीठच्या खेळाडूंना करता आली नाही. शेवटी हा सामना एसआरएम विद्यापीठ संघाने जिंकला.

पूल-डी मध्ये लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, फगवाडा संघाने मुंबई विद्यापीठ संगाला २-१ गोलने पराभूत केले.  लव्हली युनिव्हर्सिटी संघाकडून लवप्रीत जैंथने १७ व्या व निशांतने ५८ व्या मिनिटाला गोल केले. मुंबई विद्यापीठ संघाचा एकमेव गोल जय धनावडने २१ व्या मिनिटाला केला.

पूल-सीमध्ये आता पंजाबी विद्यापीठ (३ गुण; १ सामना); पुणे विद्यापीठ (३ गुण; २ सामने) आणि एसआरएम विद्यापीठ (३ गुण; २ सामने) गुणांच्या बाबतीत अव्वल स्थानावर आहे, तर बनारस विद्यापीठ (० गुण; १ सामना) पाठोपाठ आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.