Hockey Tournament : 16 वर्षांखालील हॉकी स्पर्धा, गतविजेत्या सेल अकादमीला सुखजीवन संघाने बरोबरीत रोखले

एमपीसी न्यूज : येथे सुरु असलेल्या एसएनबीपी 16 वर्षांखालील मुलांच्या अखिल भारतीय स्तरावरील हॉकी स्पर्धेत गतविजेत्या सेल हॉकी अकादमी संघाला (Hockey Tournament) रविवारी झालेल्या सामन्यात सुखजीवन स्पोर्टस अकादमी संघाने 3-3 असे बरोबरीत रोखले.

म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरु असलेल्या या स्पर्धेत अखेरच्या मिनिटाला मिळालेला पेनल्टी स्ट्रोक सुखजीवन संघासाठी निर्णायक ठरला.(Hockey Tournament) त्यांच्या देवनाथ नन्वरने ही संधी साधताना सामना बरोबरीत सोडवला. सेल संघाला आकाश राजभारने 6 व्या मिनिटाला गोल नोंदवून आघाडीवर नेले. पण, 13 व्या मिनिटाला सुनील लाक्राने सुखजीवन संघाला बरोबरी साधून दिली. मध्यंतराला सामना 1-1 असा बरोबरीत राहिला होता.

उत्तरार्धात सेलने तीन मिनिटात दोन गोल नोंदवून आघाडी मिळवली. प्रथम मनीष कुमारने 35 व्या मिनिटाला मिळालेला पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावला.(Hockey Tournament) त्यानंतर पुढच्याच मिनिटाला मनीषने मैदानी गोल करून आघाडी वाढवली. पण, सुखजीवन संघाच्या युवराज सिंगने 40 व्या मिनिटाला गोल करून पिछाडी कमी केली. त्यानंतर सामना संपण्यास एक मिनिट शिल्लक असताना देवनाथने मिळालेल्या पेनल्टी स्ट्रोकवर सुखजीवन संघाला बरोबरी साधून दिली.

ACB action : एक लाख रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक व वकीलाला अटक

स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी देखील गोलांचा पाऊस पडला. आज झालेल्या सामन्यातून एकूण 48 गोल नोंदवले झाले. पश्चिम बंगालच्या खुशिदा स्कूल संघाने भोंगिर हॉकी अकादमी संघाचा 9-0 असा पराभव केला. या सान्यात निखिल गोस्वामीने पाच गोल केले.

 

 

 

निकाल –

गट अ : खुशिदा स्कूल, पश्चिम बंगाल : 9 (निखिल गोस्वामी 9, 20, 23, 30, 50 वे मिनिट, दीपक पटेल 12, 58 वे मिनिट, ओम प्रामाणिक 41 वे मिनिट, सुभजित तमांग 59वे मिनिट) वि.वि. भोंगीर हॉकी अकादमी, तेलंगणा. मध्यंतर 5-0

 

गट एच : भारतीय विद्या भवन, कोडागू, केरळ : 2 (चरिह शेट्टी 48 आणि 51वे मिनिट) वि.वि. हॉकी नाशिक: 0. मध्यंतर 0-0

 

गट ई : स्मार्ट हॉकी अकादमी, रायपूर छत्तीसगड : 9 (रमन कुमार 18, 27, 51 वे मिनिट,  प्रिन्स कुमार 24, 36, 39 वे मिनिट, यदुविंदर सिंग 32 वे, सुरजित राजभर 34 वे, शुभंकर सोनकर 50 वे) वि.व. तमिळनाडू हॉकी असोशिएनश 1 (किशोर के.52 वे मिनिट) मध्यंतर 3-0

 

गट जी : सेल हॉकी अकादमी, राउरकेला, ओडिशा : 3 (आकाश राजभर 6वे; मनीष कुमार 35वे आणि 38 वे मिनिट) बरोबरी वि. सुखजीवन स्पोर्ट्स अकादमी, आग्रा: 3 (सुनील लखरा 13 वे, युवराज सिंग 40वे, देवनाथ ननवर 59 वे मिनिट). मध्यंतर 1-1

 

गट ब : शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती (एसजीपीसी), अमृतसर: 12 (अर्शदीप सिंग 8 वे; साहिबप्रीत सिंग 13 वे, 17 वे, हर्षदीप सिंग 23, 26, 46 वे मिनिट; जगजीत सिंग 40 वे, 42, 60 वे मिनिट, गुरुप्रता सिंग 48, 59वे मिनिट) वि.वि. बिष्णुपूर हॉकी, मणिपूर: 0. मध्यंतर 5-0

 

(शनिवारचा सामना) गट ड : वन थाउजंड हॉकी लीग (ओटीएचएल) इलेव्हन, नवी दिल्ली : 9 (अनिल कुमार 2 रे (पीसी), 46 वे मिनिट, शिवा चौहान 25 वे मिनिट,  युवराज ओराव 17 , 40, 60 वे मिनिट, विवेक कुमार राठोड 42 वे; भूपेंद्र सिंग 57 आणि 58 वे) वि.वि. कोलकाता वॉरियर्स, कोलकाता: 1 (पुष्पेंद्र सिंग 35वे). मध्यंतर 3-0

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.