Holiday Sanction for Graduate Voting : मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तीक रजा मंजूर !

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला आहे. त्यानुसार मतदान मंगळवारी (1 डिसेंबर) सकाळी 8 ते सायकांळी 5 पर्यंत होणार आहे. त्यादिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तीक रजा मंजूर करण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून निर्देश प्राप्त आहेत. पदवीधर-शिक्षक मतदानानंतर मतमोजणी गुरूवारी (3 डिसेंबर) होणार आहे. या निवडणुकीसाठी मतदार असलेल्या पदवीधर व शिक्षक मतदारांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजाविता येण्यासाठी मतदानाच्या दिवसाची विशेष नैमित्तीक रजा मंजूर करण्याचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून निर्देश प्राप्त आहेत.

मतदानासाठी देण्यात आलेली रजा ही कर्मचाऱ्यांना असलेल्या नैमित्तीक रजेव्यतिरिक्त असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.