Home MInister Celebrate PSI’s Birthday: गृहमंत्र्यांनी साजरा केला सुरक्षा ताफ्यातील PSIचा वाढदिवस

Home MInister anil deshmukh Celebrate PSI's Birthday on pune mumbai express way पुण्याहून मुंबईकडे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून गृहमंत्री जाणार होते. त्यावेळी त्यांच्या सुरक्षा ताफ्यात पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी होते.

एमपीसीन्यूज – गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुण्याहून मुंबईला जाताना त्यांच्या सुरक्षा ताफ्यातील पोलीस उपनिरीक्षकाचा वाढदिवस साजरा केला. हा वाढदिवसाचा कार्यक्रम निळ्या नभा खाली, भर रस्त्यावर साजरा झाला. गृहमंत्र्यांनी स्वत: पोलीस उपनिरीक्षकाला केक भरवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख हे रविवारी (दि.7) पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. दिवसभर पुणे परिसरात विविध ठिकाणी पाहणी, पोलिसांनी केलेल्या कामाची माहिती घेतल्यानंतर गृहमंत्री सायंकाळी पुण्याहून मुंबईकडे निघाले.

पुण्याहून मुंबईकडे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून गृहमंत्री जाणार होते. त्यावेळी त्यांच्या सुरक्षा ताफ्यात पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी होते.

त्यामध्ये पौड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव हे देखील कर्तव्यावर हजर होते.

दि. 7 जून रोजी उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांचा वाढदिवस होता. त्यांचे काही मित्र पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर किवळे फाट्यावर थांबले होते. मित्रांनी जाधव यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केक आणला होता.

या नियोजनाबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांना माहिती मिळाली. त्यांनी आपला ताफा किवळे फाट्यावर थांबवण्याचे आदेश दिले.


श्रीकांत जाधव यांचे मित्र आणि पोलिसांच्या समवेत गृहमंत्री देशमुख यांनी श्रीकांत जाधव यांचा वाढदिवस साजरा केला.

केक कापल्यानंतर गृहमंत्री देशमुख यांनी स्वतः उपनिरीक्षक जाधव यांना केक भरवला आणि दीर्घायुष्याचा शुभेच्छा दिल्या. यानंतर गृहमंत्री मुंबईसाठी एक्सप्रेस वे मार्गे मुंबईकडे रवाना झाले. यानंतर उपनिरिक्षक जाधव यांचा आनंद ओसंडून वाहू लागला.

गृहमंत्री स्वतः पोलीस बांधवांमध्ये मिळून मिसळून राहत आहेत. पुणे येथील कार्यक्रमात देखील कोरोनाच्या काळात पोलीस करत असलेल्या कामाचे गृहमंत्री देशमुख यांनी कौतुक केले होते. यामुळे पोलीस दलात हुरूप आला आहे.

वाढदिवस साजरा केल्याचा व्हिडिओ गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या ट्विटरवरून शेअर देखील केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.