Pune News : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस आयुक्तालयात केक कापून केले नवीन वर्षाचे स्वागत

एमपीसी न्यूज : नववर्षाचं स्वागत करण्यासाठी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख पुण्यात आले होते. मध्यरात्री 12 वाजता त्यांनी ‘होप 2021’ अशा आशयाचा केक कापून नवीन वर्षांचे स्वागत केलं. यावेळी त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना केकचं वाटप करत त्यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. नवीन वर्षानिमित्त संकल्प करत पोलीसांसाठी काम करायचं असल्याचं त्यांनी मसांगितले. 

यावेळी त्यांनी कंट्रोल रूम ला भेट देत बरोबर 12 वाजता आलेला तक्रारीचा कॉल उचलला, नवीन वर्षातील तो पहिला कॉल होता .एका सोसायटीत नवीन वर्षाचं स्वागत 12 पर्यंत सुरु आहे, आवाज कमी करायला सांगा असा तो कॉल होता…..लगेच त्या हद्दीतील पोलीस स्टेशनकडे त्यांनी कॉल दिला…

यावेळी बोलताना ते म्हणाले, काही वेळात नवीन वर्षात पदार्पण करत आहोत.गेले दहा महिने डॉक्टर नर्स पोलीस सर्वजण लढत आहेत. आमचे पोलीस दिवस रात्र रस्त्यावर असतात,आज ३१ डिसेंबर सर्वजण उत्साहात साजरा करतात, तरीही आम्ही कायदा व्यवस्था राखण्यासाठी काम करत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.